Mon, Jun 17, 2019 19:12होमपेज › Pune › चोरट्यांकडून चार लाखांचा ऐवज जप्त

चोरट्यांकडून चार लाखांचा ऐवज जप्त

Published On: Dec 02 2017 2:09AM | Last Updated: Dec 02 2017 1:14AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

गस्तीवर असताना संशयावरून पकडलेल्या दोन सराईत चोरट्यांकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणून चार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी सांगवी पोलिसांनी केली आहे. जम्बो ऊर्फ गणेश रमेश काळे (20) आणि प्रितेश संगू काळे (31, दोघे रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सुनील बोकड व शिपाई जितेश कोथंबिरे हे रात्रगस्तीवर होते. त्यांना दोन जण संशयास्पदरीत्या वावरताना दिसले. दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीचे साहित्य मिळाले. त्यांना याब्यात घेऊन त्यांच्याकडे  अधिक तपास केला असता त्यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले.

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 123.5 ग्रॅम सोन्याचे, 85.100 ग्रॅम चांदीचे दागिने व एक दुचाकी असा 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक अजय चांदखेडे, अरविंद जोंधळे, सहायक निरीक्षक बलभीम ननावरे, देवेंद्र शिंदे, कर्मचारी सुरेश खांडेकर, दिनेश देशमुख, रोहिदास बोर्‍हाडे, कैलास केदारी, आशिष डावखर, विनायक डोळस, सुरेश काशीद, अरुण नरळे, गणेश तरंगे, शशिकांत देवकांत, दीपक पिसे, शिमोन चांदेकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा या पथकाने कामगिरी केली आहे.