Sun, Jul 05, 2020 05:08होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीचे 3 जानेवारीला उद्घाटन 

सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीचे 3 जानेवारीला उद्घाटन 

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:22AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गांधीनगर, पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्याशेजारी बांधलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीचे उद्घाटन 3 जानेवारीला केले जाणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. मात्र, त्या इमारतीचा वापर कसा करायचा, त्याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. त्यामुळे बैठकीत अंतिम तोडगा निघाला नाही. या संदर्भात आयुक्तांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. इमारतीमध्ये महापालिकेची विविध कार्यालये सुरू करायची की, सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करायचे याबाबत बैठकीत निश्‍चित निर्णय झाला नाही. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विविध विषय समिती अध्यक्ष शारदा सोनवणे, सागर गवळी, सुनीता तापकीर, उषा मुंढे, आश्‍विनी जाधव, नगरसेवक संतोष लोंढे, राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, गिरीश वाघमारे, संतोष जोगदंड, संजय सरोदे, गुलाब पानपाटील, देवेंद्र तायडे, के. डी. वाघमारे, अजय जाधव आदी उपस्थित होते. 

फुले स्मारक इमारतीमध्ये ‘ब्रिटिश लायब्ररी’च्या धर्तीवर शहराचे मध्यवर्ती ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व संदर्भ ग्रंथालयाचे नियोजन करावे. महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी ‘एसएसआयटी’सारखे अन्य अभ्यासक्रम या ठिकाणी घेण्यात यावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचे नियोजन करावे. व्याख्यानाचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, या संदर्भात बैठकीत चर्चा केली गेली. एकनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. गिरीश वाघमारे यांनी आभार मानले. दरम्यान, सदर इमारतीमध्ये महापालिकेची कार्यालये सुरू न करता सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 20) येऊन महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.