Wed, Nov 21, 2018 13:19होमपेज › Pune › सलमान खान, शिल्पा शेट्टीचा निषेध

सलमान खान, शिल्पा शेट्टीचा निषेध

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:49AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी वाल्मीकी समाजाबाबत अपशब्द वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. सलमानवर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी अखिल वाल्मीकी समाज, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने माजी नगरसेवक अरुण टाक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, नगरसेवक संतोष लोंढे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रताप गुरव, देवेंद्र तायडे, वाल्मीकी समाज शहराध्यक्ष राजू परदेशी, सोमनाथ बेद, मोहन बिडलान, सचिन माने, धर्मवीर चंडालिया आदी उपस्थित होते.