Tue, Nov 13, 2018 06:43होमपेज › Pune › साडेबारा टक्के जमीन परतावा, पोलिस आयुक्तालयाची मागणी

साडेबारा टक्के जमीन परतावा, पोलिस आयुक्तालयाची मागणी

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:52AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के परतावा व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी या मागणीसाठी पिंपरीचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात निर्णय होऊनही वेळकाढूपणा चालू असलेल्या शहरातील या दोन प्रश्‍नांसाठी विधानसभेतील पायर्‍यांवर उभे राहून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले. आ.  चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली सेनेचे सत्यजित पाटील, राजन साळवी, सुजीत मिंचेकर, सुरेश गोरे, प्रकाश आबीटकर आदी आमदारांनी यामध्ये भाग घेतला.

प्राधिकरणातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के जमीन परतावा मिळावा यासाठी आ. चाबुकस्वार यांनी यापूर्वी तीन वेळा नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. हा विषय अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहे. तशीच परिस्थिती शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीबाबत झाली आहे. निर्णय झाला; परंतु अर्थ खात्याची मान्यता; तसेच प्रशासकीय सुस्तपणामुळे हा देखील प्रश्‍न लटकून राहिला आहे. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये आ.  चाबुकस्वार यांनी याप्रश्‍नी विधानसभेत लक्षवेधीही मांडली होती.