Fri, Apr 26, 2019 19:37होमपेज › Pune › मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 2:15AMपिंपरी : प्रतिनिधी 

परिमंडलात सन 2015 ते 2017 पर्यंत एकूण 390 बदल्यांपैकी 77 बदल्या या संशयास्पद आहेत. त्यापैकी एक असलेले मोशी सहायक अभियंता विक्रांत वरुडे यांची दोन वर्षांत 5 वेळा बदली ऑर्डर काढली गेली; परंतु त्यांनी राजकीय पुढारी यांना हाताशी धरून पैशाच्या जोरावर पुन्हा बदली रद्द करून घेतली. मोशी येथून दोन वेळा बाहेर बदली झाली असताना देखील पुन्हा मोशीला बदली सदर अधिकारी करून घेतात. मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली दिली असल्याची माहिती संतोष सौंदणकर यांनी सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. सौंदणकर  म्हणाले की, विक्रांत वरुडे हे मनमानी पद्धतीने काम करणे, बाह्य स्रोत कर्मचारी हाताशी धरून स्वतः कामे घेणे, एखादे काम ठेकेदारास मिळाल्यास रोहित्रावर भार नाही, असे सांगून त्या ठेकेदारास काम मिळणार नाही याची सोय करतो, नंतर सदर

रोहित्रावर विनामंजूर भार वाढवून घेतो व ते काम स्वतःच्या अधिकाराखाली बाह्य स्रोत कर्मचारी हाताशी धरून करतो, वरिष्ठ कार्यालयास अंदाजपत्रक पाठवून देतो व नंतर पुन्हा स्वतःच पत्र देऊन अंदाजपत्रक चुकीचे पाठविले आहे, असे लिहून देतो व काही दिवसांनंतर सदर बांधकाम व्यावसायिकास भेटून ते काम स्वतः बाह्य स्रोत कर्मचारी यांच्या मार्फत घेतो व तेथील रोहित्र कोणतीही वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी न घेता रोहित्र जास्त भाराचे बसवून तेथील भार मंजूर करून घेतो, अशा व इन्फ्रा 2 योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. सदर शाखा अभियंत्यास 22 महिन्यांत चुकीच्या कामाबद्दल 8 ते 10 वेळा चार्जशीट दिलेले आहे. 2 ते 4 प्रकरणांत त्यास शिक्षा देखील झाली आहे. 

यावर प्रकाश भवन पुणे येथे प्रादेशिक संचालक यांना भेटण्यास पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉ. असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद गेले असता, मंत्री महोदय यांनी शेरा केलेले निवेदन दिले. मी या निवेदनावर काहीही ठोस आश्वासन देऊ शकत नाही व काहीही कारवाई करू शकत नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, यामागे काय राजकारण चालू आहे, असे सांगत मंत्री महोदयांच्या पत्राला केराची टोपली दाखवली.