Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शिवसेना गटनेत्यांचा संगणक नेला उचलून! 

शिवसेना गटनेत्यांचा संगणक नेला उचलून! 

Published On: Dec 16 2017 2:21AM | Last Updated: Dec 16 2017 1:25AM

बुकमार्क करा

 पिंपरी प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक प्रशासनाने उचलून नेल्याचा प्रकार आज घडला. यासंदर्भात आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याशी सं पर्क साधला असता ते म्हणाले की ,स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी ’ गटनेत्यांच्या अनुपस्थितीत संगणकाचा बाहेरच्या व्यक्तीकडून वापर होत आहे ’अशी तक्रार आपल्याकडे केल्याने हा संगणक काढून घेतला आहे गटनेते आल्यावर संगणक सुविधा पुन्हा दिली जाईल असे आयुक्तांनी सांगितले

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर सर्वच पक्षाच्या पदाधिकार्यांची कार्यालये आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे कार्यालय देखील याच मजल्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपच्या कारभाराबाबत अनेक वृत्त प्रसिध्द होत आहेत. माजी नगरसेवक मारूती भापकर हे या कार्यालयातून पत्रके टाईप करून घेतात  प्रशासनासोबत पत्रव्यवहार करतात.यावर भाजप पदाधिकार्‍यांचा आक्षेप आहे त्यामुळेच हा संगणक पालिकेने उचलून नेल्याची चर्चा आहे

याबाबत पत्रकारांशी बोलताना भापकर  म्हणाले की ,भाजपचे उद्योग आम्ही उघड करतो, म्हणूनच सुडबुध्दीचे राजकारण करत भाजपच्या   पदाधिकार्यांनी प्रशासनावर दबाव टाकत संगणक उचलून नेण्यास भाग पाडले आहे.मी पालिका निवडणुकीत सेनेचा उमेदवार होतो सेनेच्या गटनेत्यांच्या कार्यालयातून जनहिताची एखादी प्रेस नोट काढली तर बिघडले कुठे ? आयुक्त श्रावण हार्डीकर हे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप भापकर यांनी केला

याबाबत सेना गटनेते राहुल कलाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता  प्रकृती अस्वास्थ्यमुळे संपर्क होऊ शकला नाही. पक्षनेते एकनाथ पवार यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेचे गटनेते नसताना त्यांच्या कॅबिनमधील संगणकाचा गैरवापर केला जाऊ शकतो अन्य कोणी सं गणकाचा वापर करू नये या प्रामाणिक भावनेतून संगणक तूर्त तेथून हलविला आहे गटनेते आल्यावर त्यांना संगणक सुपूर्द केला जाईल गटनेत्यांच्या कोणत्याही सुविधा काढण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही असे ते म्हणाले.