Mon, Jun 17, 2019 19:02होमपेज › Pune › कचरावेचकांना मिळेना ‘पीएफ’ची रक्कम

कचरावेचकांना मिळेना ‘पीएफ’ची रक्कम

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:36AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

वारंवार मागणी करूनही शहरातील कचरावेचकांना पीएफची रक्कम मिळेना झाली आहे. ठेकेदारांकडून कचरावेचकांवर अन्याय होत आहे. याबरोबरच महापालिका देखील त्याची दखल घेत नाही. त्यामुळे कचरावेचकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल  कचरावेचक संघटना करत आहे. 

कचरावेचक, सफाई कर्मचारी, वाहनचालक व इतर सर्वांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेतले जाते. त्यामुळे संबंधीत कंत्राटदाराकडून किमान वेतनानुसार पगार दिला जात नाही. त्यामुळे कचरा वेचकांसह सफाई कर्मचार्‍यांनाही किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा; तसेच कंत्राटी पद्धतीचे निर्मुलन करावी अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. 

शहरात सुमारे 375 महिला कचरावेचक, 170 ड्रायव्हर व 2 हजार सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. या कामगारांचा वेतनाचा प्रश्‍न, आरोग्याच्या सुविधा, पीएफची रक्कम व कायमस्वरुपी काम मिळणेबाबत समस्येंचा सामना करावा लागत आहे.  कचरावेकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेकवेळा आंदोलन केले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.