Mon, May 20, 2019 22:12होमपेज › Pune › पवनाथडी जत्रेस एक दिवसाची मुदतवाढ

पवनाथडी जत्रेस एक दिवसाची मुदतवाढ

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 1:58AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेस पाच दिवसांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता जत्रेस मंगळवार (दि.9) पर्यंत  आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. जत्रा रात्री दहापर्यंत सर्वांना खुली राहणार आहे.  सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात जत्रा सुरू आहे. जत्रेत विक्रमी एकूण 872 महिला बचत गटांचे विविध स्टॉल आहेत. मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे 217 व शाकाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे 221 स्टॉल असून, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीच्या 434 स्टॉलवरही नागरिक खरेदी करीत आहेत. शनिवारी (दि. 6) व रविवारी (दि. 7) पवनाथडी जत्रेत मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी सहकुटुंब जत्रेस भेट देत आनंद लुटला. 

नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, पवनाथडीस आणखी एका दिवसाची म्हणजे मंगळवारपर्यंत (दि.9) मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना जत्रेचा आनंद आणखी एक दिवस घेता येणार आहे. 
मंगळवारी जत्रा रात्री दहापर्यंत खुली राहणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. ज्या नागरिकांनी जत्रेचा आनंद घेतला नाही, त्यांनी मंगळवारी जत्रेस सहकुटुंब भेट देऊन खरेदी करावी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 8) दुपारी राहुल मोरे व सहकार्‍यांचा ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.  लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘लावण्याची लावण्यवती’  या क्रार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.