Sun, May 26, 2019 20:44होमपेज › Pune › कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बालकाचा मृत्यू

कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बालकाचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. हिंजवडी, माणगाव येथे रविवारी (दि. 25)  सकाळी ही घटना घडली. साहिल भुट्टो अन्सारी (05, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. भुट्टो अन्सारी हे माण येथील मोहिते वस्ती येथे राहतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भुट्टो उठले. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा साहिल हाही उठला. आई झोपलेली होती, तर वडील सकाळच्या वेळची आवरा-आवर करत होते. त्यावेळी साहिल हा प्रातर्विधीला गेला होता. अचानक आलेल्या चार-पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. 

साहिलच्या कमरेच्या खालच्या बाजूचे लचके तोडले. यामध्ये साहिल ओक्साबोक्सी रडत होता. रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे धावत आले. त्यांनी कुत्रांना हाकलले. कुत्र्यांच्या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला. आई-वडिलांना सांगितल्याने तेही पटकन आले. जखमी साहिलला उपचारासाठी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला  तासाभरानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच साहिलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस घटनास्थळी आणि वायसीएम रुग्णालयात दाखल केले. चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत. डॉक्टरांचा हालगर्जीपणा चार-पाच कुत्र्यांनी साहिलचे लचके तोडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. अशा आवस्थेत त्याला माणच्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरांचा हालगर्जीपणामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत. साधनांचा अभाव आणि डॉक्टरांची काम करण्याची पद्धत या मुळे साहिलचा रक्तस्राव थांबवता आला नाही. सुमारे एक-दीड तास रक्तस्राव  झाल्याने साहिलचा मृत्यू झालाचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.
 

 

 

tags : Pimpri ,news,5 year,old,boys ,dies,dogs,attack,


  •