Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Pune › आतापर्यंत पिंपरी महापालिकेचे  22 कर्मचारी ‘लाच’प्रकरणी जाळ्यात

आतापर्यंत पिंपरी महापालिकेचे  22 कर्मचारी ‘लाच’प्रकरणी जाळ्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  ;  प्रतिनिधी

महापालिकेसंदर्भातील काम करण्यासाठी अधिकारी लाच मागतात. विशिष्ट रकम अदा केल्यानंतरच ‘फाईल’ पुढे सरकते. असे खाबूगिरी करणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) कचाट्यात अडकत आहेत. भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभार्‍यांच्या काळातच अशी प्रकरणे मोठ्या संख्येने उघड होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या 26 वर्षांत तब्बल 22 अधिकारी खाबूगिरीत सापडले आहेत. 

पिंपरी गावातील करसंकलन विभागातील कनिष्ठ लिपिक अमोल वाघिरे याला सदनिकेचे हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी 2 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.26) अटक केली. त्यामुळे नागरिकांची पालिकेसंबंधित कामे मार्गी लागण्यासाठी लाच दिल्याशिवाय फाईल हलत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यास काही प्रामाणिक अधिकारी अपवाद आहेत. सन 1997 पासून आतापर्यंत झालेल्या कारवाईत तब्बल 22 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

त्यात पालिकेच्या कंत्राटी व हंगामी कर्मचार्‍यांचा समावेश नाही. त्यामुळे ही संख्या 50 च्या पुढे जाते.  सदनिकेच्या नोंदणीसाठी 300 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 1992 मध्ये उपलेखापालास अटक झाली होती. लेखा विभागातील उपलेखापालाल ठेकेदाराची अनामत रकम परत देण्यासाठी 100 रुपये लाच घेताना ऑगस्ट 1997 मध्ये ताब्यात घेतले होते. सांगवी करसंकलन कार्यालयात 1 हजार 300 रुपये लाच स्वीकारताना लिपिकास जानेवारी 1995 मध्ये अटक केली होती.  परवाना विभागात 2 हजार रुपये लाच घेताना मुख्य लिपिकास एप्रिल 1998 ला अटक झाली होती. पाणीपुरवठा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला 200 रुपये लाच घेताना फेबु्रवारी 1999मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

परवाना विभागात लाच घेताना एका लिपिकाला जानेवारी 2000 मध्ये अटक झाली होती. परवाना विभागात लाच घेताना मुख्य लिपिकास अटक केली होती. मोशी कार्यालयातील लिपिकास 1 हजार रुपये लाच घेताना ऑगस्ट 2000 मध्ये अटक झाली होती. चिंचवड विभागीय कार्यालयात लाच घेतल्याप्रकरणी मुख्य लिपिक सप्टेंबर 2002 मध्ये एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. जकात विभागातील निरीक्षकाला दीड हजार रुपये घेताना एप्रिल 2004 मध्ये अटक झाली होती. भूमी जिंदगी विभागातील लिपिकाला 5 हजार रुपये घेताना जुलै 2005 मध्ये ताब्यात घेतले होते. ‘वायसीएम’ रुग्णालयात लाच घेताना लिपिकास मे 1998 मध्ये अटक केली होती. आरोग्य निरीक्षकाला रक्‍कम घेताना एप्रिल 2012 मध्ये ताब्यात घेतले होते. मुख्य आरोग्य निरीक्षकाला ऑगस्ट 2012 मध्येे पैसे घेताना अटक केली होती. 
सर्व्हेअर व अनुरेखकाला 3 हजारांची लाच घेताना ऑक्टोबर 2014ला अटक झाली होती. 
 

 

 

tags ;Pimpri,news,Pimpri, municipal, 22 employees,bribe, case,


  •