Sun, Apr 21, 2019 02:01होमपेज › Pune › गौणखनिजाची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

गौणखनिजाची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ; प्रतिनिधी

देहूफाटा येथे अनधिकृत वाळू आणि खडीची वाहतूक करणार्‍या पंधरा ट्रकवर तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी कारवाई केली. कारवाई करून वाळू व खडीची वाहतूक करणारे पंधरा ट्रक जप्त केले आहेत. या ट्रक मालकांना पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. 

देहूफाटा येथून अवैधपणे गौणखनिज घेऊन जात असलेल्या ट्रकची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांच्या मदतीने देहूफाटा येथे सापळा रचण्यात आला. वाळू घेऊन जाणारे ट्रक आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. या ठिकाणाहून 15 ट्रकमधून खडी, डस्ट, क्रश सँड आदींची वाहतूक केली जात होती. चालकांकडे चौकशी केली असता या मालाची वाहतूक अवैधरीत्या घेऊन जात असल्याची माहिती समोर आली. 

कारवाई केलेले ट्रक प्राधिकरणातील तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले आहेत. नायब तहसीलदार संजय भोसले, तलाठी अर्चना रोकडे आणि पवार आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.