Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला

मनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 1:13AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड येथील चिंचवडेनगर येथे एक मनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला होता. सुमारे दोन तास तो त्या विजेच्या खांबावर कसरत करत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवले. विशेष म्हणजे या तरुणाला साधे खरचटले देखील नाही.

समिर इन्सान खान (20, रा. चिंचवडेनगर, चिंचवडगाव) असे या तरुणाचे नाव आहे. एक तरुण विजेच्या खंबावर चढला असल्याची माहिती अग्निशमन दलास मिळताच अग्निशमन दलाचे जवान अशोक कानडे, शंकर पाटील, अमोल खंडारे, मुकेश बर्व व भूषण एवले हे त्या ठिकाणी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी हा प्रकार पाहून तातडीने वीज बंद केली व त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या तरुणाने उतरण्यास नकार दिला. जवान खंबावर चढले त्यावेळी तरुणाने वरून त्यांना लाथा मारण्यास सुरुवात केली. या वेळी तातडीने रुग्णवाहिका बोलविण्यात आली. सव्वासात ते सव्वाआठ या एक तासाच्या कसरतीनंतर हा तरुण कसाबसा खाली उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.  समिर हा मनोरुग्ण असून या आधीही त्याने असे धाडसी कृत्ये केली आहेत. त्यामुळे आज पहाटे तो घरातून कधी उठून गेला हे त्यांनाही कळाले नव्हते, असे त्याच्या घरच्यांनी सांगितले.