Wed, Apr 24, 2019 19:48होमपेज › Pune › घरगुती सिलिंडर वापरणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

घरगुती सिलिंडर वापरणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:34AM

बुकमार्क करा

 पिंपरी ः प्रतिनिधी

घरगुती सिलिंडर व्यवसायाकरिता वापरणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करत सिलिंडर जप्त करण्यात आले. निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध परिसरातून एकूण 45 सिलिंडर जप्त करण्यात आले. अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या आदेशानुसार दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी चिंचवड, गणेश सोमवंशी, पुरवठा अधिकारी, प्रशांत ओहोळ व बबन माने, पुरवठा अधिकारी, सुनील कास्टेवाड, लिपिक संतोष लिमकर, बाबासाहेब ठोंबरे व गणपत राजे; तसेच वाकड स्टेशनचे पोलिस हवालदार पन्हाळे एस. सी., व्ही. टी. खोमणे, बी. ए. लाळगे व  चिंचवड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक एस. टी. ढवळे व महिला पोलिस नाईक चौधरी यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

अनेक नागरिक घरगुती सिलिंडर  व्यावसायिक कामांसाठी वापरले जात आहेत. शासनाकडून सिलिंडर वर सबसिडी मिळत आहे. ही सबसिडी घेऊन काही नागरिक चुकीच्या कामासाठी याचा वापर करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी घरगुती सिलिंडर  व्यावसायिक कामांसाठी वापरले जात होते. अशा लोकांवर निगडी शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये भारत गॅस सिलिंडर-29, हिंदुस्थान कंपनीचे -13 व इंडेन कंपनीचे - 3  अशा एकूण 45 सिलिंडरवर जप्त करण्याची कारवाई केली. वाल्हेकरवाडी, काळेवाडी, रहाटणी, चिंचवड, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज परिसरातील हॉटेल, स्नॅक्स सेंटर, चायनीज सेंटर, खानावळ व टपरीधारकांवर कारवाई केली; तसेच भारत पेट्रोल कंपनीचे दीप ज्योतसिंग, इंडेन कंपनीचे जगदीश टी.,  यांच्या उपस्थिती उपस्थितीत आदिती भारत गॅस एजन्सी काळेवाडी यांच्याकडे कायदेशीररीत्या सुपूर्तनामा तयार करून सिलिंडर परिमंडळ अधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्या  समवेत जमा केले.