Wed, Nov 21, 2018 21:44होमपेज › Pune › ‘घर बचाव संघर्ष’च्या आंदोलनास दोनशे दिवस

‘घर बचाव संघर्ष’च्या आंदोलनास दोनशे दिवस

Published On: Jan 01 2018 2:03AM | Last Updated: Dec 31 2017 11:05PM

बुकमार्क करा
पिंपरी  :वार्ता

घर बचाव संघर्ष समितीने सुरू केलेल्या रिंग रोड आंदोलनास 200 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्ताने पिंपळे गुरव येथे रविवारी (दि.31) कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कासारवाडी, पिंपळे गुरव परिसरातील रिंग रोडबाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या दोनशे दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील हजारो बाधित कुटुंबीय हक्काच्या घरांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. अनधिकृत घरांच्या प्रश्‍नाबाबत शासनाने नागरिकांच्या हिताचा निर्णय न घेतल्यामुळे अजूनही समितीचे आंदोलन सुरूच आहे.  आज आंदोलनास 200 दिवस पूर्ण झाले. त्यानिमिताने विशेष ‘जागृती’ मोहीम रविवारपासून शहरामध्ये सुरू झाली. या वेळी विजय पाटील, शिवाजी इबितदार, रेखा भोळे, रजनी पाटील, चंदा निवडुंगे, माउली जगताप, प्रदीप पवार उपस्थित होते.