Fri, May 24, 2019 21:35होमपेज › Pune › पिंपरीत ‘वायसीएम’च्या डॉक्टरांमध्ये हाणामारी

पिंपरीत ‘वायसीएम’च्या डॉक्टरांमध्ये हाणामारी

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:07AM

बुकमार्क करा

पिंपरी : वार्ताहर

हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरला दुसर्‍या डॉक्टरने शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांत वाद होऊन किरकोळ मारामारी करत दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार शुक्रवारी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर घडला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता संबंधित डॉक्टर हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी आले होते. त्या वेळी दुसर्‍या डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली.

यामुळे दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रूपांतर भांडणात झाले.  यामध्ये दोन्ही डॉक्टरांनी एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत प्रकरण वाढवले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच मापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालयात धाव घेतली. नेहमीच कोणत्या त्या कोणत्या कारणावरून चर्चेत असणारे हे रुग्णालय डॉक्टरांच्याच मारहाणीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणाची कोणीही पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही.