Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Pune › पंकजांच्या माध्यमातून मुंडे गटाचा दबाब  

पंकजांच्या माध्यमातून मुंडे गटाचा दबाब  

Published On: Feb 05 2018 1:31AM | Last Updated: Feb 05 2018 1:23AMपिंपरी : ’संजय शिंदे

आठवणीतील गोपीनाथ मुंडे’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड मधील विस्कळीत मुंडे गट एकत्र झाला. शहरातील राजकारणात काहीसा दुर्लक्षित केलेल्या या गटाने जरी शहरातील सत्ताधार्‍यांनी आम्हाला दुर्लक्षित केले असले तरी आमच्या वाली पंकजा मुंडे आहेत हे दाखवीत शहरातील  नेत्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात आहे. शनिवारी (दि.3)  स्व.केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना मानणार्‍या शहरातील गटाने आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमाचे आयोजन करून एक दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुंडे साहेब यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम होते. औद्योगिकनगरीत कामानिमित्त मराठवाडयातील व परिसरातील नागरिक स्थायिक झाले आहेत.  

त्यांच्यावर  स्व. मुंडे यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांना या ठिकाणी काही अडचण आली की ते स्वतः त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत होते.त्याचप्रमाणे बहुजन समाजातील शहरवासियाच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते.  त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यावर राज्यसह पिंपरी-चिंचवड शहरात प्रेम व निष्ठा ठेवणार्‍यांची संख्या आज ही मोठी आहे.  परंतु त्यांच्या आकस्मिक जाण्याने मुंडे गट पोरका झाला. त्यांच्या जाण्याने मुंडे गटाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा राज्यभर आहे; मात्र मुंडे साहेब यांचा वारसा यशस्वीपणे पंकजा मुंडे सांभाळत आहेत.मुंडे साहेब यांनी ज्या भोळ्या भाबड्या जनतेवर प्रेम केले त्यांचे अश्रू पुसण्याचे काम पंकजा मुंडे करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत मुंडे गटाला उमेदवारीत डावलण्यात आल्याची भावना त्यावेळी निर्माण झाली होती.त्यानंतर शहरातील करभार्‍यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते. निवडणुका होऊन भाजप सत्तेत आले; त्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीच्यावेळी जुना गट म्हणजेच मुंडे गट आक्रमक होत प्रदेश स्तरावरून जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात मुंडे गट यशस्वी झाला होता. त्याचे सर्व श्रेय पंकजा मुंडे यांना देण्यात येत आहे.त्याचप्रमाणे राज्य, जिल्हास्तरावरील निवडीमध्ये ही निष्ठावान गटाला संधी मिळावी यासाठी पंकजा ना साकडे घालण्यात आले.मुंडे साहेब असते तर आमच्यावर अन्याय झाला नसता त्यांच्या पश्च्यात आपण आम्हाला ताकद द्या असा सूर या कार्यक्रमातून आळविण्यात आला.