Sat, Sep 22, 2018 07:06



होमपेज › Pune › शौचालयाच्या प्रश्‍नावरून सावळे घोडेकर खडाजंगी

शौचालयाच्या प्रश्‍नावरून सावळे घोडेकर खडाजंगी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पिंपरी ः प्रतिनिधी

उघड्यावर शौचास बसत असल्याने नेहरूनगरातील एचए कंपनी मैदान परिसरातील घाणीचे साम्राज्य वाढून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. वैशाली घोडेकर यांनी उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक शौचालय पाडणार्‍यांनी शौचालयाचा विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार घालविला असल्याचा आरोप स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला. त्यावरून दोघींमध्ये तुफान खंडाजगी झाली. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.28) झाली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. महापालिका सभेच्या अजेंड्यावर स्वच्छ भारत अभियानातून उभारल्या जाणार्‍या शौचालयांच्या कामकाजाचा आढावासंदर्भातील अवलोकनार्थ विषय होता. या प्रस्तावाला अनुसरून घोडेकर यांनी नेहरूनगरच्या एचए कंपनीच्या मैदानावर झोपड्या टाकून राहणारे नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचा विषय मांडला. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, तेथील रहिवाशांना त्रास होत असून आरोग्य प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्यामुळे त्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.दरम्यान, पालिकेचे सार्वजनिक शौचालय पाडणार्‍यांकडूनच उघड्यावर शौचास जाणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी होत असल्याचा आरोप साळवे यांनी केला. त्याला घोडकर यांनी शब्द जपून वापरा, मी शौचालय पाडले नाही, असे प्रत्युत्तर दिले. नेहरूनगरमधील शौचालय पाडल्याप्रकरणी अनेक सामाजिक संघटनांनी अर्ज केले असून, त्यानुसार महापालिकेने गुन्हा दाखल केला का, असा सवाल सावळे यांनी उपस्थित केला. आयुक्तांना खुलासा मागत गुन्हा दाखल करण्याची 

मागणीही केली. दोघींनी एकमेकींवर जोरदार आगपाखड करत सभागृहात दणाणून सोडले. त्यामुळे सभागृह अवाक् झाले होते. महापौर काळजे; तसेच उपमहापौर शैलजा मोरे यांनी दोघींना खाली बसण्याचे व शांत राहण्याचे आवाहन करूनही या दोघींचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे महापौरांनी चालू विषय मंजूर करून सभा पुढे चालू ठेवली. त्यानंतर या दोघींचा वाद निवळला.