Wed, Jan 23, 2019 12:46होमपेज › Pune › मित्राचा खून करणारा एक जण गजाआड

मित्राचा खून करणारा एक जण गजाआड

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:38AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

एकमेकांना बोलण्याच्या वादातून रिअल इस्टेट व्यावसायिक मित्राचा खून करून फरारी असलेल्यांपैकी एकाला दिघी पोलिसांनी अटक  केली आहे. गणेश अंताराम गंगणे (40, दिघी) याचा शनिवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी नीलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) याला अटक केली आहे, तर अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहिती नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी) हे तिघे फरार आहेत.

नीलेश कुदळे व इतरांचे गणेश गंगणे यांच्याशी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. हे सर्व जण न्यू मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्यात वाद झाले. रात्री सव्वाच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि नीलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला.