Tue, Jun 02, 2020 19:41होमपेज › Pune › ई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

ई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 1:09AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ‘ई-वेस्ट’ (इलेक्ट्रॉनिक्स कचरा) संकलन महाअभियान राबविण्यात आले. त्यात स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. अभियानात सहभागी संस्था व व्यक्तींचा सत्कार नुकताच करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला. पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या सहायक धर्मदाय आयुक्त कांचनगंगा सुपाते-जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.  कमिन्स इंडियाचे मिलिंद म्हेत्रे, ताथवडेतील इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली कालकर, पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, निगडीच्या आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, पोलिस

नागरिक मित्र संघटनेचे राहुल श्रीवास्तव, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे पदाधिकारी अंगद जाधव, आरोहनम संस्थेचे समीर बोटे, पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशनचे डॉ. राजेश मणेरीकर, रिसायकलरचे मुख्य विनीत बहेती, टाटा मोटर्सचे पर्यावरण विभाग पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नीलकंठ पोमण, सहायक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, कुंडलिक दरवडे, बाबासाहेब कांबळे, विनोद बेंडाले, प्रभाकर तावरे, धोकाजी शिर्के, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर सासवडकर, किरण चौधरी आदींना सन्मानचिन्ह व पर्यावरणविषयक पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला. 

शहरातील ई-वेस्ट संकलन व विल्हेवाट लावण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्याने कमिन्स इंडिया कंपनीच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत ई-वेस्ट संकलन महाअभियानात राबविण्यात आले. त्यामध्ये शहरातील महाविद्यालये व सामाजिक संघटना यांनी विशेष पुढाकार घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या ई-वेस्ट संकलन अभियानासाठी कायमस्वरूपी जागा निश्‍चित करून ही चळवळ दररोज चालविण्यासाठी महापालिकेसोबत नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रभाकर मेरुकर यांनी सूत्रसंचालन केले.  दत्तात्रय कुमठेकर यांनी आभार मानले.