Tue, Sep 25, 2018 12:53होमपेज › Pune › पिंपरी : डॉक्टरची सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या 

पिंपरी : डॉक्टरची सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या 

Published On: Feb 08 2018 5:00PM | Last Updated: Feb 08 2018 4:59PMपिंपरी : प्रतिनिधी

भोसरी येथे स्वतःचे रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरने सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी (ता. ८) मोशी येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

डॉ महेश महादेव मोहिते ( वय २७, रा. मोशो) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. महेश यांचे भोसरीत जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. सकाळी ११ वाजता रूग्ण तपासणीसाठी आल्याने त्यांचा भाऊ डॉ महेश यांना सांगण्यासाठी गेला. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, महेश यांच्या हाताला सलाईन लावल्‍याचे निदर्शनास आले.