Sat, Sep 22, 2018 16:27होमपेज › Pune › रंगाचे फुगे फेकताना बसमधून पडून मृत्यू

रंगाचे फुगे फेकताना बसमधून पडून मृत्यू

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:36AMपिंपरी : प्रतिनिधी

एकमेकांवर रंगांचे फुगे फेकताना बसमधून तोल जाऊन खाली पडल्याने  एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राज सतीश कांबळे (14, रा. भोसरी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. राज आपल्या मित्रांसोबत रंगफेक करण्यात मग्न होता. बसमध्ये मित्रांना रंग लावण्याच्या नादात तोल जाऊन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण शहरात रंगांची उधळण होत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.