Wed, May 22, 2019 16:44होमपेज › Pune › ग्राहकांची अनास्था; महिलांची उदासीनता

ग्राहकांची अनास्था; महिलांची उदासीनता

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:33AM

बुकमार्क करा

पिंपरी ः पूनम पाटील

ग्राहकांची सर्व क्षेत्रांत संख्या वाढत असून, फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. याकामी ग्राहक असंघटित असून, हा दिवस केवळ एक म्हणून दिवस साजरा न करता संघटित होऊन ग्राहकांच्या हक्कासाठी लढा द्यावा व होणारी फसवणूक टाळावी, असे आवाहन शहरातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे. खासकरून महिलांची सर्वाधिक फसवणूक होत असून, ग्राहकांच्या हक्कांची जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवड येथील ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहकांच्या संरक्षणार्थ ग्राहक संरक्षण कायदा-1986 करण्यात आला. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल, निकृष्ट सेवा, अनुचित व्यापारी प्रथा; तसेच पिळवणूक आदींबाबत मार्गदर्शन करणे हा या कायद्याचा प्रमुख हेतू असून, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे व त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचीही तरतूद आहे. यामध्ये खासगी, सरकारी व सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात आलेला आहे; मात्र ग्राहक याकामी उदासीन असून, शासनही अंमलबजावणीसाठी फारसे आग्रही नसल्याने दिवसेंदिवस ग्राहकांची फसवणूक होत आहे.