होमपेज › Pune › सर्वत्र एकसारख्या रंगांचे पेव्हिंग ब्लॉक

सर्वत्र एकसारख्या रंगांचे पेव्हिंग ब्लॉक

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 1:31AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र एकसारख्या रंगांचे पेव्िंहग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. तसे धोरण महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अवलंबले आहे. हे काम करताना जुन्या पेव्हिंग ब्लॉकचे ‘ऑडिट’ही केले जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांना हिशेब द्यावा लागणार आहे.  स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.13) झाली. त्यात रस्त्यांसोबतच विविध ठिकाणी रंगीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा प्रस्ताव होता. त्याला धरून सभेत पेव्िंहग ब्लॉकची कामे अर्धवट अवस्थेत आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, या संदर्भात महापालिकेने धोरण ठरवावे, अशी जोरदार चर्चा झाली. 
समितीचे सदस्य राजू मिसाळ म्हणाले की, निगडी व प्राधिकरण परिसरात पेव्हिंग ब्लॉकची कामे अर्धवट आहेत.

खोदाई करून ठेवल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेने शहरात सर्वत्र एकसारख्या रंगांचे पेव्िंहग ब्लॉक लावण्याचे ठरविले आहे. मात्र, सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. शहर अभियंत्यांच्या पत्रामुळे कामे बंद आहेत. धोरण ठरवा; मात्र त्याचा नागरिकांना त्रास होता कामा नये.  शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी आयुक्तांच्या आदेशाने कामे बंद ठेवली आहेत. नवीन धोरण करण्याचा आयुक्तांचा विचार असल्याचे सांगितले. अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या की, पेव्िंहग ब्लॉकविषयी प्रशासन धोरण करीत आहेत. हे करीत असताना जुन्या-नव्याचा हिशेब ठेवावा. जुने ब्लॉक जातात कुठे आहेत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. या विषयीची आकडेवारी ‘अपडेट’ करायला हवी. खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे प्रशासनाने करावीत. नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पेव्हिंग ब्लॉकचे एक काम पाहताना त्रुटी आढळल्या. त्याविषयी नवीन धोरण करण्यासाठी सर्व कामे थांबविली आहेत. सनियंत्रण योजनेसाठी ही कामे थांबविली आहेत. याबाबत सर्व अभियंत्यांनी आपापल्या भागातील कामांची माहिती द्यायची आहे. पूर्वी असलेल्या पेव्िंहग ब्लॉकची छायाचित्रे, नवीन बसविण्यात येणार्‍या ब्लॉकची छायाचित्रे, जुन्या ब्लॉकचा कोठे वापर करणार याचीही माहिती द्यायची आहे.

रंगीत ब्लॉकऐवजी, दीर्घकाळ टिकतील, असे ब्लॉक वापरण्याची गरज आहे. दिसायला चांगले असण्यापेक्षा टिकायला चांगले, असे ब्लॉक हवे आहेत; तसेच संबंधित कामांची गरज काय, आवश्यकता आहे किंवा नाही याबाबतही अभियंत्यांनी माहिती द्यायची आहे. याचे स्पष्टीकरण असल्याशिवाय काम करता येणार नाही. सध्या सर्व प्रभागांत अर्धवट स्थितीतील कामांमुळे नागरी अडथळा होत असेल, असे प्रस्ताव प्रशासनाकडे आणावेत, मंजुरी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना केल्या; तसेच नव्याने रस्ते विकसित करताना संपूर्ण रस्ता नव्याने तयार केला जावा. पूर्वीच्या रस्त्यावर डांबरीकरण केल्याने भविष्यात ते खराब होतात, असे त्यांनी सांगितले.