Tue, Jun 25, 2019 21:25होमपेज › Pune › स्वच्छ शहर सर्वेक्षण पुढील महिन्यात

स्वच्छ शहर सर्वेक्षण पुढील महिन्यात

Published On: Dec 03 2017 2:38AM | Last Updated: Dec 03 2017 2:02AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छ  सर्वेक्षण  4 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे.  शहर स्वछतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या अभियानामध्ये  पिंपरी-चिंचवड शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे,  असे आवाहन महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी शनिवारी (दि.2) केले. 

महापालिका व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने महापालिकेतील आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण आणि उद्यान विभागासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात शनिवारी झाली, त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक डॉ. उदय टेकाळे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके; तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, आशा राऊत, सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक व अभियंते आदी उपस्थित होते. डॉ. टेकाळे म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशभरातून सुमारे 4 हजार 41 शहरांचा सहभाग असणार आहे.  सुमारे 4 हजार गुण या स्पर्धेत देण्यात येणार असून, 3 टप्प्यांमध्ये हे गुणांकन होणार आहे.