Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Pune › पालिकेत ‘सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफीस’ कार्यान्वित

पालिकेत ‘सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफीस’ कार्यान्वित

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 1:24AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘सिटी  ट्रान्स्फॉर्मेशन ऑफीस’ महापालिका भवनात कार्यरत झाले आहे. पॅलेडियम कन्स्टींग इंडिया प्रा. लि. ही इस्राईलची कंपनी असल्याने अटी व शर्ती पूर्ण करून करार करण्यास विलंब होत आहे. असे असतानाही ‘स्वच्छ शहर सर्वेक्षण’चे काम सध्या सुरू केले गेले आहे. महापालिका पॅलेडियम कंपनीच्या मार्फत हे ऑफीस कार्यरत राहणार आहे.

कंपनीच्या प्रधिनिधींनी शुक्रवारी (दि.15) कंपनीच्या कामासंदर्भात सादरीकरण केले. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख निलकंठ पोमण आदी उपस्थित होते. सिटी टॉन्स्फॉर्मेशन ऑफीसचे कामकाज कसे असले. प्रत्यक्ष कामकाज कसे केले जाईल, किती अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत, आदीसंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी पॅलेडियम कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या शंकांना त्यांनी उत्तरे दिले. याचप्रकारची आणखी एक बैठक होणार आहे. 

कंपनी परदेशी असल्याने अटी व शर्ती तपासून करार केला जाणार आहे. त्यामुळे करार करण्यास विलंब होत आहे, असे निलकंठ पोमण यांनी शनिवारी (दि.16) सांगितले. दरम्यान, सिटी टॉन्स्फॉर्मेशन ऑफीस करीता महापालिका भवनातील अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अंतर्गत कंपनीचे कामकाज नुकतेच सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाला 4 जानेवारीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कंपनीकडून स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भातील कामे सध्या करून घेण्यात येत आहेत. या कामांमुळे स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड शहराचे गुण वाढीस मदत होणार आहे, असे पोमण यांनी सांगितले. सदर ऑफीसमध्ये कंपनीचे कायम स्वरूपी 5 समन्वय अधिकारी हजर राहणार आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार 6 अधिकारी हजर राहून कामकाज करणार आहेत.