Wed, Jan 16, 2019 09:40होमपेज › Pune › वल्लभनगर आगारातून नाताळ सुटीनिमित्त बस 

वल्लभनगर आगारातून नाताळ सुटीनिमित्त बस 

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 2:19AM

बुकमार्क करा


पिंपरी ः प्रतिनिधी

वल्लभनगर आगारातून नाताळच्या सुटीनिमित्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांनी मागणी केल्यानंतर या जादा बस सोडण्यात येणार आहेत. सुटीनिमित्त सहलींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जातात त्यामुळे वल्लभनगर आगारातून त्यांच्यासाठी खास बसची सुविधा देणार असल्याची माहिती आगार प्रमुख अनिल भिसे यांनी दिली.

दरवर्षी कार्निव्हल स्पेशल रामोजी फिल्म सिटी आणि गोव्याला वल्लभनगर येथून बस सोडण्यात येत होत्या. परंतु चालूवर्षी बसची उपलब्धता कमी असल्याने बसचे नियोजन केले नसले तरी नागरिकांनी मागणी केल्यास बस सोडण्यात येईल असे आगारप्रमुखांनी सांगितले. त्यामुळे नाताळच्या सुटीनिमित्त धार्मिक स्थळाबरोबरच काही पर्यटनस्थळी एसटी बस वल्लभनगर आगारातून उपलब्ध असणार आहेत.