Sat, Mar 23, 2019 18:41होमपेज › Pune › पुणे : बदल्यांवरून जुंपली; अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍तांचा धक्‍कादायक आरोप (व्‍हिडिओ) 

पुणे : बदल्यांवरून जुंपली; अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍तांचा धक्‍कादायक आरोप (व्‍हिडिओ) 

Published On: Aug 28 2018 1:27PM | Last Updated: Aug 28 2018 1:29PMपिंपरी : संतोष शिंदे 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित होण्याच्या पूर्वसंध्येला शहरातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुणे शहर आणि ग्रामीण भागात वर्ग करून घेण्यात आले. शहर आणि ग्रामीणच्या प्रमुखांकडून या बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्याच बेकायदा आहेत, असा दावा पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त मकरंद रानडे यांनी केला आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग 'पुढारी'च्या हाती लागले आहे. 

अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रलोभन दाखवून दमदाटी करत धमकाविले जात असल्याचा धक्कादायक आरोप रानडे यांनी केला. याबाबत 'पुढारी'च्या हाती लागलेल्या वायरलेस कॉलमध्ये ऐका रानडे नेमके काय म्हणाले...