Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Pune › चार हजार फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केव्हा?

चार हजार फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केव्हा?

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:13AM

बुकमार्क करा

पिंपरी ः वातार्ताहर

 शहरात 10 हजार फेरीवाले आहेत. यामध्ये 5900 लोकांचे बायोमेट्रिक  सर्वेक्षण झाले असून अद्याप 4 हजार 100 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण बाकी आहे. महापालिकेकडून हे सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अनेक फेरीवाल्यांना व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. हे सर्वेक्षण होऊन परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेत शहरातील फेरीवाले आहेत.   पथारी, हातगाडी, टपरीधारक व स्टॉलधारक यांचा फेरीवाला म्हणून समावेश होतो. त्यांना पालिकेच्या अधिकार्‍यांकडून अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. चुकीच्या कारवाईमुळे अनेक फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय सोडला आहे. या फेरीवाल्यांचे प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने घ्यायचे असते; मात्र त्यांनी असे प्रशिक्षण घेतले नाही.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने असे प्रशिक्षण घेऊन एक हजार प्रमाणपत्रे देण्यात आली,  तरीही अधिकारी फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करत नसल्याचे चित्र आहे. शहरातील फेरीवाले अनेक वर्षांपासून परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना परवाने देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दहा हजारांपैकी केवळ 5 हजार 900 लोकांचेच सर्वेक्षण झाले असून,  4 हजार 100 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण बाकी आहे. सर्वेक्षण केले तरी झोन निश्‍चित होईपर्यंत व ओळखपत्र देईपर्यंत कारवाई करू नये, असा नियम आहे. राजकीय नेत्यांचे फोन गेल्यास महापालिका कर्मचारी कारवाई करत आहेत.  
क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्‍यांकडून व्यवसाय करणार्‍या व्यक्तीचा फोटो घेतला जातो. तो संगणकावर त्या व्यवसाय करणार्‍याच्या नाव आणि नंबरवर जोडला जातो. 

प्रत्येकाला सर्वेक्षणाचा प्रभाग  क्रमांक दिला जातो. नंतर ओळखपत्र दिले जाते. यामुळे त्या व्यवसाय करणार्‍या व्यक्तीच्या जागेवर इतर बोगस व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही. महापालिकेचे अधिकारीही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. फिरता व्यवसाय करणार्‍यालाही सर्वेक्षण नंबर दिला जातो. सर्वेक्षण झाल्यानंतर लिखित स्वरूपात पास दिला जातो. नंतरची प्रक्रिया करण्यासाठी प्रभाग कार्यालयात जाण्याच्या सूचना दिल्या जातात; मात्र या बायोमेट्रिक सर्वेक्षणाकडे महापालिकेचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.