Thu, Apr 25, 2019 16:11होमपेज › Pune › ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेसाठी 55 कोटी

‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेसाठी 55 कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर इत्यादी भागातील पाणीगळती रोखण्यासाठी आणि पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध कामांच्या 54 कोटी 33 लाख 34 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.29) मान्यता दिली. त्यासह एकूण 60 कोटी 77 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चास समितीने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्षा सीमा सावळे होत्या. पुणे-मुंबई जुन्या महामार्ग व काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील ‘बीआरटी’ सेवा सुरू करण्यासाठी  प्रचार व प्रसारविषयक कामांसाठी 54 लाख 75 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. 

मासुळकर कॉलनी परिसरात पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी 20 लाख 90 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांकडील कागदपत्रे, नस्ती, नकाशे, स्कॅनिंग व डिजिटलायजेशन करून जतन करण्यासाठी 1 कोटी 49 लाख 36  हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. कासारवाडी, रावेत व इतर मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी उर्वरित आरसीसी सीमाभिंत बांधण्यासाठी 59 लाख 94 हजार रुपये आणि केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरच्या भागातील रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी 1 कोटी 66 लाख 88 हजार रुपये खर्चास समितीने मान्यता दिली. 
व्यायामशाळा भाड्याने  देण्याचा विषय फेटाळला

महापालिकेचा पिंपरी गावातील दशरथ कापसे व्यायामशाळेवरील हॉल नृत्य संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा विषय फेटाळून लावण्यात आला, तर निगडी गावठाणातील उड्डाणपूल ते एलआयसी इमारतीपर्यंतच्या रस्त्याच्या कडेने कलर पेव्िंहग ब्लॉक बसविण्याचा कामाचा ठेका देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. व्यायामशाळा 11 महिने 2 हजार 500 रुपयांप्रमाणे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा प्रस्ताव क्रीडा समितीच्या सभेत मंजूर झाला होता. व्यायामशाळा व साहित्य महापालिकेचे आणि ती चालविणार्‍यास पैसे द्यायचे, ही पद्धत चुकीची आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर व्यायामशाळांबाबत नवीन धोरण तयार करणार आहेत, असे सावळे यांनी सांगितले.