Mon, Jun 17, 2019 05:05



होमपेज › Pune › पिंपरी : सर्व क्षेत्रीय समितीवर भाजपचे पदाधिकारी 

पिंपरी : सर्व क्षेत्रीय समितीवर भाजपचे पदाधिकारी 

Published On: Apr 26 2018 4:26PM | Last Updated: Apr 26 2018 4:26PM



पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय समितीवर प्रत्येकी 3 प्रमाणे एकूण 24 स्वीकृत सदस्यांची गुरूवारी (दि.26) मतदानाद्वारे निवड करण्यात आली. आठही क्षेत्रीय समितीवर अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपचा कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.  

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. त्या पदासाठी तब्बल 121 जण इच्छुक होते. त्या निवडीवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठका होऊन त्यात नावे निश्‍चित करण्यात आली. निष्ठावंत गटाने त्याचा समर्थकांना संधी मिळावी म्हणून शेवटपर्यंत आग्रह धरला होता. फेब्रुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीत मदत करणार्‍याच्या गळ्यात स्वीकृत सदस्यांची माळ पडली आहे. निवड झालेल्या सदस्यांनी आपल्या परिसरात गुलाळ उधळत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. दुसरीकडे निवड न झालेल्या इच्छुकांनी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाराजाची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, पालिकेत सत्तेत येऊन भाजपला वर्षाचा कालवाधी लोटला. तरीही, क्षेत्रीय समितीवर स्वीकृत सदस्यांची निवड करून त्यांची वर्णी लावली जात नसल्याने पक्षामध्ये नाराजी वाढत होती. अखेर स्वीकृत सदस्यांना संधी दिली गेली आहे. पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी असेपर्यंत म्हणजे पुढील पावणेचार वर्षे या स्वीकृत सदस्यांचा कालावधी असणार आहे. मात्र, अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी निश्‍चित केला आहे, असे सुत्रांनी सांगितले. 

निवड झालेल्या स्वीकृत सदस्य पुढीलप्रमाणे- 

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय समिती :  राजेश सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय समिती : बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील.  ‘क’ क्षेत्रीय समिती कार्यालय : सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय समिती : चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप. ‘इ’ क्षेत्रीय समिती कार्यालय : अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय समिती : दिनेश यादव, संतोष  मोरे, पांडुरंग भालेकर. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय समिती : संदीप गाडे, विनोद तापकीर, गोपाळ माळेकर. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय समिती : अनिकेत काटे, कुणाल लांडगे, संजय कणसे