Tue, Jun 18, 2019 22:20होमपेज › Pune › अजय काळभोर टोळीतील गुन्हेगाराला शस्‍त्रांसह अटक

अजय काळभोर टोळीतील गुन्हेगाराला शस्‍त्रांसह अटक

Published On: Apr 12 2018 4:26PM | Last Updated: Apr 12 2018 4:26PMपिंपरी : प्रतिनिधी 

अजय काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाने आज अटक केली. त्‍याच्याकडून दोन पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दत्ता विट्ठल आगलावे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्‍या सराईताचे नाव आहे. आगलावे याला पिंपरी परिसरातून अटक करून त्‍याच्याकडून 61 हजार 200 रूपयांचा साठा जप्त केला आहे. ही पिस्तुले उत्तर प्रदेशातुन आणून येथील गुन्हेगारांना विक्री करण्याचा व्यवसाय तो करत असल्याचे पोलिस निरीक्षक ब्रह्मनंद नाईकवाडी यांनी सांगितले. या टोळीतील अजय काळभोर आणि तिरूपती उर्फ़ बाब्या जाधव याला यापूर्वी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे.