Wed, Jan 23, 2019 03:33होमपेज › Pune › डिसेंबरमध्ये 53 अनधिकृत बांधकामे भुईसपाट; 26 जणांवर गुन्हे

डिसेंबरमध्ये 53 अनधिकृत बांधकामे भुईसपाट; 26 जणांवर गुन्हे

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:23AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागांत अनधिकृतपणे चालू असलेली  53 बांधकामे भुईसपाट केली आहेत. यामध्ये 24 हजार 350 चौरस मीटर क्षेत्रफळ मोकळे करण्यात आले. याप्रकरणी 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आगामी काळात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पालिका वेगात करणार आहे. 
21 जुलै 2017 रोजी नगरविकास खात्याने राज्यातील  31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतची अधिसूचना जारी केली.

त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असून, तीन महिने संपून गेले आहेत; परंतु त्या नियमावलीतील जाचक अटींमुळे नागरिकांचा बांधकामे नियमित करण्यास प्रतिसाद मिळत नाही. गेल्या तीन महिन्यांत पालिकेकडे केवळ सात अर्ज प्राप्त झाले आहेत. अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागांत चालू असलेली  53 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. यामध्ये 24 हजार 350 चौरस मीटर क्षेत्रफळ मोकळे करण्यात आले. याप्रकरणी 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ख्रिसमस, नवीन वर्ष, महाराष्ट्र बंद अशा विविध कारणांमुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थंडावली होती. आता अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला महापालिका वेग देणार आहे.