होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले स्मारकाचे अखेर उद्घाटन

सावित्रीबाई फुले स्मारकाचे अखेर उद्घाटन

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:13AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर, पिंपरी येथे उभारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन बुधवारी (दि.3) महापौर नितीन काळजे व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त रांगोळी स्पर्धा व महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ‘क’ प्रभाग अध्यक्षा अश्‍विनी जाधव, नगरसेविका अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, सुवर्णा बुर्डे, निकिता कदम, नगरसेवक संतोष लोंढे, राहुल जाधव, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, संदीप वाघेरे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, माजी नगरसेविका शुभांगी लोंढे, लता ओव्हाळ, सहआयुक्त दिलीप गावडे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, विजय भुजबळ, सुरेश गायकवाड, गिरीश वाघमारे, दामू चंदनशिवे, ईश्‍वर कुदळे, प्रताप गुरव, विशाल जाधव, दिलीप गायकवाड, अजय जाधव, विठ्ठल लडकत, मधुकर टिळेकर आदी उपस्थित होते.  

स्मारक येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. महिला बचत गटांच्या मेळावा झाला. या वेळी शारदा मुंढे यांनी ‘होय! मी सावित्री बोलतेय...’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. किशोर केदारी यांनी सूत्रसंचालन केले. संतोष लोंढे यांनी आभार मानले.