Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Pune › महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिन’

महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिन’

Published On: Mar 25 2018 2:12AM | Last Updated: Mar 25 2018 2:04AMपिंपरी : प्रतिनिधी

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीचे (सीएसआर) माध्यमातून चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतर्फे पालिकेच्या 9 माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिन्‍रेशन मशिन बसविण्यात आले आहे. एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीतर्फे थेरगाव येथील माध्यमिक शाळेत प्रातिनिधिक स्वरूपात बसविलेल्या सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिनचे उद्घाटन स्थायी समिती सदस्या अर्चना बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या मार्च महिन्यामध्ये महिलांकरिता ‘महिला आणि स्वच्छता’ या माध्यमातून विशेष अभियान राबविण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्या निमित्ताने सॅनिटरी नॅपकीन्सचे माध्यमिक शाळांमध्ये वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास एक्साईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक संजय गायकवाड, उपव्यवस्थापक निमा गिध, पालिकचे सह आयुक्त दिलीप गावडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, मुख्याध्यापक सौदागर शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. बेद व आरोग्य निरीक्षक शांताराम माने, धनश्री भत्ते, प्रदीप पुजारी, सह शिक्षिका, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीचे पालिकेस ‘सीएसआर’अंतर्गत ‘स्वच्छ भारत’ अभियानात मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले.

शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करून स्वच्छतेच्या सवयींबाबत दिलीप गावडे यांनी मार्गदर्शन केले.  जाधव यांनी सॅनिटरी नॅपकीन वेडिंग व इन्सिन्‍रेशन मशिन्सचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. कर्डिले यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शिंदे यांनी आभार मानले. सदरच्या 7 हजार 500  सॅनिटरी नॅपकीन्सचा खर्च ‘सीएसआर’अंतर्गत प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन्स माध्यमिक विद्यार्थिनींना  विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.
 

 

tags : Pimpri,news, Sanitary napkin  machine in nine municipal schools