Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Pune › ‘आरटीई’ पहिल्या फेरीत पालकांची द्विधा अवस्था

‘आरटीई’ पहिल्या फेरीत पालकांची द्विधा अवस्था

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

आरटीई प्रवेशाची पहिल्या फेरीला 4 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या शाळांनी कोर्टाचा निर्णय येईपर्यत प्रवेश दिला नाही, अशा शाळांमधील पालकांची द्विधा अवस्था झाली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्या पाल्याचा प्रवेश अबादित राहिल का? आणि शिक्षणाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही या शब्दाला जागणार का अशी, द्विधा अवस्था पालकांची झाली आहे. 
मोफत शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे गेल्या पाच वर्षांपासूनचा परतावा शासनाकडे थकला आहे. याबाबत  काही शाळांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाहीत.

कोर्टाचा निर्णय 28 मार्चला कळणार आहे.  तोपर्यंत प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत  24 मार्चला संपली होती. दरम्यान शाळांनी प्रवेश न दिल्यामुळे आता 4 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  शाळांनी कोर्टामध्ये धाव घेतल्याने शासनालाही कोर्टाचा निर्णय येईपर्यंत शाळांवर कारवाई करता येत नाही. सध्या 28 मार्चच्या कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 29 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत शासकीय सुट्ट्या आहेत. दिलेल्या मुदतीचे फक्त चार दिवस पालकांच्या हातात आहेत. त्यामुळे ज्या पालकांच्या पाल्याचे प्रवेश पहिल्या फेरीत झालेले नाहीत त्यांना आता पहिल्या फेरीतील प्रवेश आबादित राहतो की नाही ही काळजी वाटत आहे. 

तर काही ठिकाणी कागदपत्रांचे वेगळे नवीन नियम लावून पालकांना त्रास देण्याचा प्रकार शाळा करत आहे. आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांना वेगवेगळे निकष शाळा लावत आहेत. शहरातील बहुतांश इंटरनॅशनल स्कूलमध्ये आई - वडील दोघांचेही  पॅनकार्ड नबंर मागितले जात आहेत. एखादी गृहिणी असेल तर तिचे पॅनकार्ड कदाचित नसेल तर प्रवेशासाठी अडवणूक केली जात आहे. एससी. एसटीला जातीच्या दाखल्याची आवश्यकता नाही  तरीही ते मागितले जाते. अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देणे सुरु आहे. आधारकार्ड,  रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे दिली तरी शाळांनी कागदपत्रांबाबतीत वेगळेच नियम लावले आहे. प्रवेश पद्धतीच्या निकषानुसार कागदपत्रे मागावीत अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
 


  •