Wed, Mar 27, 2019 00:17होमपेज › Pune › स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होऊन मत नोंदवा

स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होऊन मत नोंदवा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:07AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणातील 1969 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन प्रश्‍नावलीची उत्तरे द्यावीत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.   सर्वेक्षणामध्ये नागरिक आपले शहर स्वच्छतेबाबतचे अभिप्राय देऊ शकतात. स्वच्छ सर्वेक्षणात जास्तीत जास्त  नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा.  मिस कॉलसाठी 1 दाबावा. काही वेळानंतर स्वच्छ भारत अभियानकडून आपणास फोन येतो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा पिनकोड क्रमांक विचारला जाईल. तो पिन कोड टाकल्यानंतर आपल्याला शहराच्या स्वच्छतेबाबत 6 प्रश्‍नांची उत्तरे देता येतील.

शहरातील मुख्य ठिकाणांचे पिनकोड क्रमांक असे आहेत  ः दापोडी- 411012, काळेवाडी- 411017, पिंपरी- 411018, चिंचवड पूर्व -411019, भोसरी -411026, चिंचवड गाव  411033, आकुर्डी -411035, भोसरी गाव -411039, पिंपरी-चिंचवड- 411044, पिंपळे गुरव  411061, तळवडे  412114, चिखली- 411062. नागरिकांनी आपले अभिप्राय किंवा मत  देऊन स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावे. आपले पिंपरी-चिंचवड शहर देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन  पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.