होमपेज › Pune › वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त साहित्याची वाहतूक

वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त साहित्याची वाहतूक

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे, पण वाहतुकीच्या बाबतीत मात्र सर्वत्र उदासीनता दिसून येत आहे. आधीच बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यात  वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त सामानांची वाहतूक करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करून शहरातील विविध भागात चक्क सायकल, दुचाकी तसेच इतर वाहनांवर क्षमतेपेक्षा जास्त सामान भरून वाहतूक केली जात आहे. नागरीकांसाठी हा प्रकार निश्‍चितच जीवघेणा असून त्याकडे वाहतुक पोलिस बघून न बघितल्यासारख करत आहेत

वास्तविक पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम असतात परंतू याउपर दुचाकीच्या व स्वत:च्या क्षमतेपेक्षा जास्त सामानाची वाहतूक आता राजरोसपणे नागरीक तसेच छोटे व्यावसायिक करताना दिसतात, अशी वाहतूक जीवघेणी ठरू शकते. खासकरुन परराज्यातून आलेले परप्रांतीय अशा प्रकारची वाहतूक  अधिक प्रमाणात करतांना दिसत असल्याची ओरड नागरीकांतून होत आहे. सायकलीवर शोभेच्या वस्तू त्याचप्रमाणे विविध प्रकारचे विक्रीचे सामान लादून रस्त्याच्या मधोमध हि वाहतुक केली जात आहे. 

काही सायकली व तिचाकींवर रिकामे तेलाचे डबे, तसेच भंगार किवा रद्दीमाल मोठ्या प्रमाणाक लादून शहरातील विविध भागात ही वाहतुक केली जात आहे. याकडे सरसकट दुर्लक्ष केले जात असून रस्त्यावरील वाहनचालकांमध्ये मात्र भितीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून तर अशा प्रकारच्या वाहतुकीचे प्रमाण वाढतच असून यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात घडल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली. शहरात हे प्रकार वाढील लागले असून वाहतुक पोलिस नेमके करतात तरी काय असा प्रश्‍न नागरीकांना पडू लागला आहे.