Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Pune › मराठा समाजाची कोल्हापुरात 7 एप्रिलला गोलमेज परिषद

मराठा समाजाची कोल्हापुरात 7 एप्रिलला गोलमेज परिषद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  ;प्रतिनिधी

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. समाजाची पुढची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी कोल्हापूरमध्ये रेसिडेन्सी क्लब येथे ही परिषद होणार आहे. राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, संस्था, इतिहास संशोधक, मार्गदर्शक आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मधुकरराव पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सावंत, मराठा युवा अध्यक्ष रवींद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, मराठा युवा संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष शार्दूल जाधवर, मराठवाडा युवा अध्यक्ष दत्ता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
सुरेश पाटील म्हणाले की, यापूर्वी मोर्चातून प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
 

 

 

tags ; Pimpri,news,Maratha, Samaj, Kolhapur, 7 April, Round, Table, Council,

 


  •