Wed, Apr 24, 2019 02:05होमपेज › Pune › इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published On: Feb 05 2018 1:31AM | Last Updated: Feb 05 2018 1:28AMपिंपरी:   नंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सबरमतीच्या धर्तीवर नदी सुधार प्रकल्पांची वारंवार घोषणा झाली मात्र या योजना अद्याप कागदावरच आहेत पवनेबरोबरच इंद्रायणी नदी प्रचंड प्रदूषित होत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे  इंद्रायणी नदी ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली नदी आहे ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे 4 किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते मात्र ही नदी प्रदूषित होताना दिसत आहे 

टाळगाव चिखली येथील स्मशानभूमी जवळ नाला थेट इंद्रायणी नदीत  सोडण्यात आला आहे भुयारी गटाराचे पाणीही थेट नदीत सोडले जात आहे  स्मशान भूमीत अंत्यसंस्कारा नंतर कडबा हार निर्माल्य नदीत सोडले जात आहे चिखलीकडून मूईकडे जाणार्‍या पुलाजवळ संपूर्ण नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे नदीपात्राच्या बाजूने भंगाराची दुकाने असून भंगार व्यावसायिकांनी टाकलेला  कचरा नदीत साठला आहे कंपन्यांचे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडले जाते नदी पात्रात गवतही वाढले आहे टेम्पो ट्रक मधून राडारोडा नदीत आणून टाकला जातो या सर्व कारणांमुळे इंद्रायणी प्रदूषित होत आहे 

इंद्रायणीच्या होत असलेल्या प्रदूषणाबाबत पिपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की इंद्रायणी सुधार साठी सविस्तर प्रकल्प अहवाल(डी पी आर) तयार करण्यासाठी आशा कामाचा अनुभव असणार्‍या प्रकल्प सल्लागाराकडून निविदा प्रस्ताव मागवण्यात आला होता साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलॉपमेंट प्रकल्प केलेल्या एच सी पी या कम्पनी कडून निविदा प्राप्त झाली आहे मात्र  अधिक निविदा याव्यात यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले