Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Pune › चतुर्थीनिमित चिंचवड गावात भाविकांची गर्दी

चतुर्थीनिमित चिंचवड गावात भाविकांची गर्दी

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:12AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवड गावात भाविकांनी महासाधू मोरया गोसावी मंदिरात  दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे पाचपासून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. त्या वेळी भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर चतुर्थीनिमित्त भरणार्‍या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. 

चिंचवड येथील गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची  विधिवत पूजा करण्यात आली. त्यांनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वेळी दूरवरून आलेल्या भाविकांनीही शांततेत दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने दर्शनास येणार्‍या भाविकांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; तसेच गर्दीमुळे वाहतुकीचा मार्गही बदलण्यात आला होता.

या  वेळी  भाविकांनी केलेल्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. चतुर्थींनिमित्त भरलेल्या बाजारात भाविकांनी विविध वस्तूंसह उपवासाचे पदार्थ; तसेच विविध खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. रात्री 9.49 वाजता चंद्रोदयानंतर भाविकांनी दिवसभर केलेल्या उपवासाची सांगता केली.