Thu, Nov 15, 2018 18:23होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड महापालिकेत जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत असणार्‍या कचराकुंडीमध्ये पत्त्यांचा संच आढळला असून, पत्ते नेमके कोण खेळते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेत पत्ते (जुगार) खेळणार्‍यांवर कडक कारवाई  करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एका खासगी वृत्तवाहिनीचे  पत्रकार महापालिकेत विविध घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी मुख्य इमारतीच्या आवारात गेले असता, मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कचराकुंडीमध्ये त्यांना पत्त्यांचा संच आढळला. 

त्यांनी महापालिकेतील कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍यांशी या प्रकारबाबत विचारणा केली असता हा कचरा आम्ही महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरून आणून या कचराकुंडीत टाकला, असे उत्तर कर्मचार्‍यांकडून मिळाले. हा प्रकार घृणास्पद  असून,  पालिकेतून अशाप्रकारे पत्ते सापडणे हे निंदनीय आहे. एकीकडे देशात जुगारबंदी कायदा अस्तित्वात असताना, दुसरीकडे मात्र चक्क पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतच जुगारबंदी कायदा सर्रासपणे पायदळी तुडविला जात असल्याचे दिसत आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणार्‍या महापालिकेला हा प्रकार शोभनीय नाही. या प्रकारची तत्काळ चौकशी करून, जुगार खेळणार्‍यांवर कडक  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 


  •