Sun, Apr 21, 2019 00:13होमपेज › Pune › निविदा न काढता शिक्षण मंडळाकडून लक्षावधींची  खरेदी 

निविदा न काढता शिक्षण मंडळाकडून लक्षावधींची  खरेदी 

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:20AM

बुकमार्क करा
 पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांची मागणी नसतानाही त्यांच्याकडून उशिरा मागणीपत्र घेऊन शिक्षण मंडळाने सन 2016-17 या आर्थिक वर्षात विविध शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. निविदा न काढताच लक्षावधी रुपयांचे साहित्य खरेदी करून ठराविक पुरवठादारांना ठेका दिल्याचे समोर आले आहे. महापालिका शिक्षण मंडळ 2 जून 2017 ला बरखास्त झाले आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने शिक्षण समिती स्थापनेची कार्यवाही सुरू आहे. शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सन 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी 
पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांना मान्यता दिली होती.मात्र, काही शाळांमध्ये आवश्यकता नसताना शिक्षण मंडळाकडून विविध कार्यालयीन फर्निचर, लोखंडी कपाटे, पडदे, सोफा सेट, लहान व मोठे बाक,  मोठे रॅक, लोखंडी खुर्च्यांची साहित्य खरेदी करण्यात आलेली आहे. 

शिक्षण मंडळाने फर्निचर खरेदीबाबत कपाट व पडदे खरेदीसाठी सुमारे 2 कोटी 18 लाख रुपयांची खरेदी केली आहे. या खरेदीत शाळांची मागणी नसताना, त्यांच्याकडून मागणीपत्र देण्यास सांगण्यात आले; परंतु मंडळाने कोणतीही निविदा न काढता भांडार विभागाकडील मंजूर दरानेच पुनर्प्रत्ययी आदेश देऊन साहित्याची खरेदी  केलेली आहे;  तसेच लोखंडी बाकांची सुमारे  1 कोटी 50 लाखांची खरेदी करण्यात आली आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षात शालेय  साहित्य खरेदी या लेखाशीर्षावर तरतूद उपलब्ध करण्यात आली होती. त्या खर्चामधून ही खरेदी करण्यात आली.