Fri, Apr 26, 2019 00:18होमपेज › Pune › दिघीत टोळक्याचा राडा

दिघीत टोळक्याचा राडा

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 1:02AMपिंपरी : प्रतिनिधी 

पूर्वी झालेल्या भांडणातून टोळक्याने तरुणाला आई-वडिलांना माहराण करून, घरावर दगडफेक केली, तसेच वाहनांची तोडफोड करत परिसरातील दुकानाचे शटर उचकटून तोडफोड करत चार लाख 10 हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार दिघी येथील समर्थनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सुबोध ऊर्फ बंट्या सुहास डोळस (19, रा. डोळसवस्ती, दिघी), प्रवीण ऊर्फ कवट्या 

अशोक बिरादार (18, रा. गायकवाडनगर, दिघी), आकाश शिवाजी चव्हाण (18, रा. गायकवाडनगर, दिघी), निखिल संतोष जाधव (18, रा. समर्थनगर, दिघी) आणि विकास रामधन पवार (22, रा. समर्थनगर, दिघी) या पाचजणांना अटक केली आहे. याप्रकरणी अशोक पवार (50, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.  अशोक पवार यांचा मुलगा बालाजी आणि सुबोध यांची पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून सुबोधने 

त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने समर्थनगर परिसरात राडा घातला.  घरावर दगडफेक केली. यामध्ये अशोक पवार आणि त्यांची पत्नी जखमी झाले. पवार यांनी भाड्याने घेतलेल्या टेम्पोची तोडफोड केली. तसेच परिसरातील दुकानांचे शटर उचकटून दुकानातील साहित्याची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. तपास दिघी पोलिस करत आहेत.