Thu, Sep 20, 2018 13:11होमपेज › Pune › बांधकाम परवानगी शुल्कापोटी महापालिकेला ४५३ कोटींचे उत्पन्न

बांधकाम परवानगी शुल्कापोटी महापालिकेला ४५३ कोटींचे उत्पन्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या बांधकाम परवानगी शुल्कापोटी 2017-18 आर्थिक वर्षात तब्बल 452 कोटी 60 लाखांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. या विभागासमोर 405 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा अधिक महसुल या विभागाने पूर्ण केले आहे.‘महारेरा’ कायद्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. 

शहरातील विविध ठिकाणी अनेक  बांधकाम प्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक म्हणून सदनिका आणि रो- हाऊस खरेदी केल्या जातात. शहराच्या विविध भागात गेल्या 7 वर्षांत बांधकामांना दिलेल्या परवानगींची संख्या पुढीलप्रमाणे आहे ः 2011 मध्ये 772, 2012 मध्ये 913, 2013 मध्ये 1 हजार 157, 2014 मध्ये 1 हजार 294, 2015 साली 1 हजार 140, 2016 मध्ये 1 हजार 523 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण सुमारे 1 हजार 900 बांधकामांना परवानगी दिली गेली आहे. 

या विभागाला 2009-10 या आर्थिक वर्षात 107 कोटी 32 लाख, 2010-11 मध्ये 126 कोटी 48 लाख, 2011-12 मध्ये 190 कोटी 24 लाख, 2012-13 मध्ये 261 कोटी 15 लाख, 2013-14 मध्ये 334 कोटी 33 लाख, 2014-15 मध्ये 239 कोटी 3 लाख, 2015-16 मध्ये 364 कोटी 19 लाख आणि 2016-17 मध्ये 351 कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. 2017-18 मध्ये ते वाढून 452 कोटी 60 लाख इतके झाले आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षांसाठी या विभागासमोर 420 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

केंद्र शासनाने ‘महारेरा’ कायदा सुरू केल्याने बांधकाम व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांची नोंदणी करीत आहेत. रेरा नोंदणी असलेल्या प्रकल्पांमध्येच नागरिक व व्यापारी रक्कम गुंतवत असल्याने बांधकाम नोंदणीची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टयापेक्षा अधिक उत्पन्न पालिकेस मिळाले आहे. वाकड परिसरात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक 905 गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या खालोखाल रहाटणी, काळेवाडी परिसरातील 425 बांधकामांना परवानगी दिली आहे. आकुर्डीत सर्वांत कमी म्हणजे 15 बांधकामे झाली आहेत.  

 

Tags : Pimpri, Pimpri news, Pimpri Chinchwad municipal, construction, Permission, income,


  •