Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Pune › पिंपरी चिंचवडमध्ये 'मराठा' आंदोलक आक्रमक  

पिंपरी चिंचवडमध्ये 'मराठा' आंदोलक आक्रमक  

Published On: Jul 29 2018 4:52PM | Last Updated: Jul 29 2018 4:52PMपिंपरी : प्रतिनिधी 

सोशल मीडियावरील शहर बंदच्या  मेसेजमुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरण चिघळू लागले आहे. मराठा तरुण आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर तरुण आक्रमक झाले आहेत. वाल्हेकरवाडी भागात तरुणांनी दुकानांवर दगडफेक करीत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. तसेच गुरुद्वारा परिसरात देखील दगडफेकीच्या तुरळक घटना समोर आल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.