Sat, Aug 24, 2019 22:29होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा

Published On: May 05 2018 7:15PM | Last Updated: May 05 2018 7:14PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा शनिवारी (दि.5) महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केला. पर्यायाने बहल यांचे गटनेतेपदही जाणार आहे. त्याच्या जागी नगरसेवक नाना काटे यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपने स्थायी समिती सदस्य काळ प्रत्येकी १ वर्षांचा केला आहे. त्यामुळे विरोधातील भाजपने विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षनेतेपदाचा कार्यकाळही एका वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे योगेश बहल यांनी आपल्या पदाचा राजीमाना शनिवारी महापौरांकडे सादर केला. महापौरांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 

बहल हे सत्ताधारी भाजपच्या विरोधकात कणखर भूमिका घेत नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची तक्रार होती. तसेच, ते नियमितपणे पालिकेत येत नसल्याचा अंसख्य तक्रार आहेत. त्यांनी सत्ताधार्‍यांसोबत हातामिळवणी केल्याचा आरोपही पक्षाच्या काही नगरसेवकांनी केला होता. बहल यांच्या जागी नगरसेवक नाना काटे यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. 

तीन ते चार जण इच्छुक

पक्ष धोरणानुसार  एका वर्षांचा कालवधी पूर्ण झाल्याने विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवीन गटनेते म्हणजेच विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. सोमवारी (दि.७) किंवा मंगळवारी (दि.८) निवड जाहिर केली जाईल. त्यासाठी ३ ते ४ जण इच्छुक आहेत. निवडीचे पत्र विभागीय आयुक्त व पालिका आयुक्तांना दिले जाईल. दरवर्षी एक या प्रमाणे पंचवार्षिकेमध्ये ५ नगरसेवकांना हे पद भूषविण्याची संधी दिली जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.