Mon, Aug 19, 2019 14:08होमपेज › Pune › पालिका सहायक आयुक्त डोईफोडे आणि कापडणीस यांची बदली

पालिका सहायक आयुक्त डोईफोडे आणि कापडणीस यांची बदली

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 10:45PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून आणि क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. बदलीचे आदेश राज्य शासनातर्फे मंगळवारी (दि.12) देण्यात आले आहेत. 

डोईफोडे यांची 12 फेबु्रवारीमध्ये लातूर जिल्हातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, सदर पदावर ते काम करण्यास इच्छुक नव्हते. रजेवर जात त्यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून 31 मे रोजीपर्यंत स्थगिती आदेश प्राप्त करून मुदतवाढ मिळविली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची मंगळवारी नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. ते पिंपरी-चिंचवड पालिकेत 5 ऑगस्ट 2014 ला रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभाग होता. 

तसेच, डोईफोडेच्या जागी उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले कापडणीस यांची अवघ्या तीन  महिन्यामध्येच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांच्या अचानक बदलीने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.