Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Pune › आतापर्यंत दीड लाख जणांनी घेतला विविध योजनांचा लाभ 

आतापर्यंत दीड लाख जणांनी घेतला विविध योजनांचा लाभ 

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:11AMपिंपरी  :प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने सन 2017-18 वर्षांत आतापर्यंत 1 लाख 51 हजार 829 जणांना लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांना 40 कोटी 53 लाख 2 हजार 789 खर्च करण्यात आला आहे. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेच्या विविध 21 योजनांसाठी 1 लाख 43 हजार 76 जणांनी लाभ घेतला आहे. त्यावर पालिकेने सर्वांधिक 30 कोटी 86 लाख 72 हजार 666 रूपये खर्च केला आहे. इतर कल्याणकारी योजनेतील 2 उपक्रमांसाठी 3 हजार 989 लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यापोटी 4 कोटी 91 लाख 68 हजार खर्च झाला. 

अपंग कल्याणकारी योजनेच्या 7 उपक्रमांसाठी 3 हजार 985 जणांना लाभ दिला आहे. त्यासाठी पालिकेने 4 कोटी 48 लाख 65 हजार 510 रुपयांचा खर्च करण्यात आला. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील 6 उपक्रमांसाठी 779 जणांना लाभ देण्यात आला. त्यासाठी 25 लाख 96 हजार 613 इतका खर्च झाला आहे. 

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 1 लाख 51 हजार 829 लाभार्थ्यांना एकूण 40 कोटी 53 लाख 2 हजार 789 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. कोणताही अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये व त्यास त्याच्या सोयीनुसार अर्ज करता यावा यासाठी  एकूण 15 योजनांची अर्ज स्वीकृती वर्षभर सुरू राहणार आहे.  नागरिकांचे अर्ज शहरातील 44 नागरी सुविधा केंद्रात मोफत उपलब्ध आहेत. अर्ज भरून देताना 20 रुपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी महापालिका भवनातील तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.