Wed, Feb 20, 2019 08:42होमपेज › Pune › पालिकेला ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार

पालिकेला ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:57PMपिंपरी : प्रतिनिधी

पाणीपुरवठा, पर्यावरण, वीज आणि पायाभूत सुविधांबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘अटल शास्त्र मार्केनॉमी अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी स्वीकारला.

मार्केनॉमी संस्थेच्या वतीने एनर्शिया फाउंडेशन आणि फाल्कन मीडिया यांच्या सहकार्याने  कार्यक्रम मुंबई येथे नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा, फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश शर्मा, उद्योजक शशांक शाह, मायक्रोटेक ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. शेखर, टीएसीसीआयचे मुख्य समन्वयक संजय भिडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर नौटियाल, नूतन सवेराचे तामल बांडोपाध्याय, संतोषकुमार चौहान आदी उपस्थित होते. 

शहरामध्ये उत्तम पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध शहर आणि स्वच्छतेसाठी पिंपरी-चिंचवड  व पुणे महापालिकेला प्रथम क्रमांकाचे सहविजेते म्हणून प्रतिष्ठित राष्ट्रीय, स्वच्छ भारत सिटी पुरस्कार, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पालिकेचे सहआयुक्त गावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.