Sun, Nov 18, 2018 11:16होमपेज › Pune › पिंपरीतील पुणे मेट्रोचे काम थांबले

पिंपरीतील पुणे मेट्रोचे काम थांबले

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:48PMपिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र बंदमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे मेट्रोचे काम गुरुवारी (दि. 9) बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अत्याधुनिक अवजड यंत्र शांत होते. ग्रेडसेपरेटरमधील दोन्ही लेन वाहतुकीस दिवसभर खुले ठेवले होते. 

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात आज बंद पुकारला होता. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवहार बंद होते. पुणे मेट्रोचे काम दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत काम वेगात सुरू आहे. अनेक ठिकाणी अत्याधुनिक यंत्राद्वारे पायलिंग केले जात आहे. तसेच, सेगमेटची वाहतूक क्रेनमधून केली जाते. पिलरसाठी अद्ययावत यंत्राद्वारे काँक्रीट भरला जातो. या मार्गावर कामात व्यस्त असलेले कामगार दृष्टीस पडतात. मात्र, बंदमुळे हे अवजड यंत्रे बंद होती. तसेच, कामगारही दिसत नव्हते. 
काम बंद असल्याने ग्रेडसेप्रेटरमधील दोन्ही लेन वाहतुकीस खुले ठेवले होते. मात्र, मेट्रोची ‘क्युआरटी’ची टीम मार्गावर लक्ष ठेवून होती. शहरातील एमआयडीसी परिसराला गुरुवारी साप्ताहिक सुटी असते. बंद असल्याने मोठ्या कंपन्यांही आज बंद होत्या. त्यामुळे परिसरात शांतता होती. 

यासंदर्भात महामेट्रोचे रिच वन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले की, बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि. 8) रात्रीपासून पिंपरी-चिंचवड शहरातील काम बंद ठेवण्यात आले आहे. रस्त्यावर मेट्रोची मोठ्या संख्येने अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. त्यामुळे काम बंद होते.